‘एक्‍स-रे’ किरणोत्सार रोखण्यासाठी नियामक मंडळे

नवी दिल्ली – वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून वापरण्यात येणारी “एक्‍स-रे’ यंत्रे आणि इतरही किरणोत्सारी सुविधांमार्फत अपायकारक किरणोत्सर्गाचा उपद्रव होऊ नये, यासाठी अणुऊर्जा नियामक मंडळाने कंबर कसली आहे. किरणोत्सार होऊ शकणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचे नियमन व नियंत्रणासाठी राज्यांत नियामक मंडळे स्थापन करण्याबद्दल समझोता करार केले जात आहेत. महाराष्ट्रासह एकंदर दहा राज्यांशी असे करार करण्यात आले आहेत.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी करार करण्यात आला आहे. वैद्यकीय निदान, तसेच उपचारांसाठी रेडिओलॉजी पद्धतीचा देशभरात व्यापक प्रमाणावर वापर केला जातो. देशातील एक्‍स-रे उपकरणांची संख्या सुमारे 50 हजारांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. ही उपकरणे योग्य स्थितीत नसल्यास अपायकारक किरणोत्सर्ग होऊन संबंधित रुग्ण आणि त्या उपकरणाचा वापर करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका उत्पन्न होतो. या संदर्भात काही सुरक्षा मानदंड किंवा निकष तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार, अणुऊर्जा नियामक मंडळामार्फत उपकरणांची तपासणी व चाचण्या घेतल्या जात असत. परंतु, उपकरणांच्या वाढत्या संख्येमुळे हे काम अडचणीचे होऊ लागल्याने मंडळाने विकेंद्रीकरणाचा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले आहे. 
“आरएसओ’चे प्रमाणपत्र बंधनकारक 

एक्‍स-रे उपकरणे, तसेच अन्य किरणाधारित उपकरणांसाठी प्रमाणपत्रांची, तसेच ना-हरकत प्रमाणपत्रांची तरतूदही करण्यात आली आहे. उपकरणांच्या रचनेसाठीही विशिष्ट मानदंड व निकष निश्‍चित करण्यात आलेले आहेत. ज्यांना अशा उपकरणांचा वापर करायचा असेल त्यांना “रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर’ (आरएसओ)चे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s