भुगोल महाराष्‍ट्राचा

सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन १नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश
७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.
क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.

 

 • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.
 • महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.

लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी. व
उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.

 

 • राज्याच्या किनारपट्टीची लांबी – ७२० कि.मी.

नैसर्गिक सीमा – 
महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत. उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.राज्याच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
राजकीय सीमा – 
महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्यप्रदेशबरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.

 

राज्य दिशा सिमेवरील चिन्ह एकूण
गुजरात वायव्य ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार
मध्यप्रदेश उत्तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया
छत्तीसगढ पुर्व गोंदिया व गढचिरोली
आंध्रप्रदेश आग्नेय गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
कर्नाटक दक्षिण नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग
गोवा दक्षिण सिंधुदुर्ग
 • राज्याच्या वायव्येस असणारा केंद्रशासित प्रदेश – दादरा व नगरहवेली
 • दोन राज्यांना संलग्न आसणारे जिल्हे – धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग
 • राज्य स्थापनेच्या वेळी असणारे जिल्हे व प्रशासकीय विभाग – २६ व ४
 • महाराष्ट्रात असणारे एकून जिल्हे व तालुके – ३५ व ३५७
 • महाराष्ट्रात क्षेत्रफळाने वर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
 • महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई
 • महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील जिल्हा – गडचिरोली
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तरेकडच्या जिल्हा – नंदुरबार
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडचा जिल्हा – सिंधुदुर्ग
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक पश्चिमेकडचा जिल्हा – ठाणे
 • सर्वाधिक जिल्ह्यांसोबत सिमा असणारा जिल्हा – अहमदनगर (एकूण सात जिल्ह्यांत)

जिल्हा विभाजन – 

 

 • रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा केला – १ मे १९८१
 • औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्या वेगळा केला – १ मे १९८१
 • उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा केला – १६ ऑगस्ट १९८२
 • चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला – २६ ऑगस्ट १९८२
 • बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर वेगळी केली – ४ ऑक्टोंबर १९९०
 • अकोला जिल्ह्यातून वाशिम वेगळा केला – १ जुलै १९९८
 • धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला – १ जुलै १९९८
 • परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्मिती केली – १ मे १९९९
 • भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती कशी केली – १ मे १९९९
 • परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्माण केला – १ मे १९९९

सध्या प्रस्तावित असणारे जिल्हे – 

 

 • महाराष्ट्राची राजधानी – मुंबई
 • महाराष्ट्राची उप राजधानी हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण – नागपूर
 • रायगड जिल्ह्याचे (जुने नाव – कुलाबा) मुख्यालय – अलिबाग
 • सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय – आरोस बुद्रुक
 • मुंबई उप्नगर जिल्ह्याचे मुख्यालय – बांद्रा (पुर्व)
 • राज्याचे प्रशासकिय विभाग – राज्याचे मुख्य सहा प्रशासकिय विभाग असून १२ उपविभाग आहेत.
 • सर्वात मोठा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद (८ जिल्हे)
विभाग जिल्हे संख्या
कोकण उत्तरेकडून-ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर्,सोलापूर
नाशिक अहमदनगर, नाशिक,धूळे, जळगाव, नंदुरबार
औरंगाबाद (मराठवाडा) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर
अमरावती (विदर्भ) अमरावती, यवंतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम
नागपूर (विदर्भ) नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा
 • सर्वात मोठा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद (८ जिल्हे)
विभागानुसार वाटून दिलेले कामे –
पुणे – शिक्षण, फलोद्यान, समाजकल्याण, सामाजिक वनिकरण, क्रिडा, साखर, नगरचना सहकार, शेती पशुसंवर्धन
मुंबई – माहिती प्रसिध्दी, दुग्धविकास, आरोग्य, उद्योग, विक्रीकर
नाशिक – आदिवासी कल्याण
नागपूर – खाणकाम व हातमाग

राज्यातील काही भागांतील वैशिष्ट्य पुर्ण नावे –

 

 • सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा सखल प्रदेश – कोकण
 • कोकणाचे प्राचीन नाव – अपरांत
 • सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा कोकणाचा भाग – तळ कोकण
 • सह्याद्री माथा तसेच त्याच्या लततचा पूर्वेकडील भाग – मावळ
 • सह्याद्रीच्या पुर्वेकडील पठाराचा पश्चिम भाग – देश
 • औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे – विदर्भ
 • विदर्भाचा पुर्व भाग – झाडी
 • मध्य व पश्चिम भाग – व-हाड.
 • बॉम्बे स्टेटचे पहिले मुख्यमंत्री – बाळ गंगाधर खेर
 • महाराष्ट्र राज्याचे उद्गाटन केले – पंडीत नेहरु
 • पुणे विभागातील जिल्हे व नाशिक आणि अहदनगर मुळेउन बनणारा भाग – पश्चिम महाराष्ट्र
 • जळगांव धुळे नंदुरबार मिळून बनणारा भाग – (तापी खोरे) – खानदेश
 • द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s