भुगोल महाराष्‍ट्राचा-महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
महाराष्ट्राचा बहुतांशी भाग ज्वालामुखी निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे. राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खो-यात आहेत. त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो.
१. कोकण किनारा –

 

 • उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
 • अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी
 • कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी
 • कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९
 • रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा
 • कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड
 • महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
 • राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)
 • राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
 • कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय
 • कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड)
 • कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
 • दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
 • कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.

२. पश्चिम घाट (सह्याद्री) –

 

 • नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.

सह्याद्रीच्या उपरांगा –

 

 • गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग –सातमाळ डोंगर
 • सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर
 • पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग – हरिश्चंद्र बालाघाट
 • शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठार
क्र. शिखर उंची (मी.) जिल्हा व वैशिष्ट्य
कळसूबाई १६४६ नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)
साल्हेर १५६७ नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे
महाबळेश्वर १४३८ सातारा
हरिश्चंद्र गड १४२४ अहमदनगर
सप्तश्रृंगी गड १४१६ नाशिक
त्रंबकेश्वर १३०४ नाशिक
 • घाट (खिंड) – उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.

सह्याद्रीतील प्रमुख घाट

घाट लांबी जोडलेली शहरे
थळघाट (कसारा) नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)
बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)
आंबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर
फोंडाघाट कोल्हापूर-गोवा
आंबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव
खंबाटकी (खंडाळा) पुणे-सातारा-बंगलोर
कुंभार्ली घाट चिपळूण (रत्नागिरी)-कराड
वरंधा घाट भोर-महाड
दिवा घाट पुणे-सासवड मार्गे बारामती
माळ्शेज घाट आळेफाटा (पुणे)-कल्याण
नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई
पारघाट १० सातारा-रत्नागिरी
रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर
पसरणी घाट वाई-महाबळेश्वर
चंदनपूरी घाट नाशिक-पुणे
आंबेनळी महाबळेश्वर-पोलादपूर
ताम्हणी रायगड-पुणे
 • नर्मदा व तापी नद्यांची खोरे वगळी करणारी ही पर्वतरांग उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वातास आमरावती जिल्ह्यात गाविलगड, तर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार (तोरणमाळ १४६१ मी.) म्हणतात.

दख्खनचे पठार –
हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.

 

 • पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते.
 • दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे.
 • गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात.
थंड हवेचे ठिकाण जिल्हा थंड हवेचे ठिकाण जिल्हा
तोरणमाळ नंदुरबार पाचगणी सातारा
खंडाळा पुणे माथेरान रायगड
रामटेक नागपूर चिखलदरा (गाविलगड) अमरावती
महाबळेश्वर सातारा लोणावळा, भिमाशंकर पुणे
जव्हार ठाणे मोखाडा, सुर्यामाळ ठाणे
आंबोली सिंधुदुर्ग येड्शी उस्मानाबाद
पन्हाळा कोल्हापूर म्हैसमाळ औरंगाबाद
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s